बंद

महिला दिवस

01/03/2018 - 07/03/2018 नंदुरबार

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्ह्यात ८ मार्च २०१८ रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. मा. जिल्हाधिकारी यांचे पुढाकाराने दि.-०१-०३-२०१८ ते ७-३-२०१८ पर्यंत महिला साप्ताह साजरा करण्यात आला. महिला राजस्व अभियानाचे कार्यक्रम घेण्यात आले. महिला मतदार नोंदणीचीहि विशेष मोहिम घेण्यात आली. दिनांक- ०८/०३/२०१८ रोजी महिलांनी विविध वेशभूषा करून घोड्यावरून रॅली काढली. दिनांक- ०८/०३/२०१८ रोजी मा. श्री. राजाराम माने (आयुक्त नाशिक) यांचे उपस्थितीत महिला मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्याच्या ठिकाणी विविध स्टॉल्स उभारून महिलांना आधार नोंदणी, मतदार नोंदणी, पॅन कार्ड, उज्वला गॅस योजना, बी.एस.एन.एल., बँकिग, आदी सुविधा दिवसभर पुरविण्यात आल्या. सभागृहात प्रचंड उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.